गालावरती येणारे हसू कुठेतरी लुप्त झाले,
पहाटे पडणारे स्वप्नही आता जुने झाले,
हुरहूर ही आता नसते मनी तिच्या,
भरले मन तिचे, त्याचे प्रेमही तीला नकोसे झाले .....
मनाच्या रातराणीला सुगंध आता येत नाही
गुलाबाची पाकळी आता वेड लावत नाही
गंध फुलांचा आता आवडत नाही
भरले मन तिचे, त्याचे प्रेमही आता आवडत नाही
तीला म्हणे भावनाचे हल्ली ओझे होते
का गुंतले होते मन हे म्हणे कोडे होते
कोड्यात राहणे म्हणे तीला ओझे होते
भरले मन तिचे, त्याचे प्रेमही आता ओझे होते
तिचे मन हल्ली ओझे वाहू शकत नाही.
प्रेम काय कुठेही मिळेल सध्या ती ते शोधत नाही ...
एक थेंब तुझ्यासाठी
१८-जुलै २०११
No comments:
Post a Comment