वाटते भेटावेसे मग स्वताला आवरू नकोस
भेटावयाचे नसेल तर कारणे शोधू नकोस
भेटलो काय किंवा नाही भेटलो आपण फरक कोणा पडतो?
पडतो ज्याला फरक तो थोडीच भेटायचे टाळतो.
भेटल्याने असे काय होणार आहे, जे न भेटल्याने होत नाही
न भेटताही जे थांबवू शकलो नाही ते भेटण्याने थांबणार नाही
ठेवून मनात शंका, जरी उद्या भेटलो ती भेटही न भेटण्या सारखीच असेल ,
न भेटताही जर मिटल्या शंका, तर भेटीची गरजच का उरेल.
भेटीतून काय साधेल , काय घडेल ह्याचा का विचार करावा
भेटण्या आधीच आपण न भेटण्याचा पण का करावा
मान्य मला दुखेल काही, खुपेल काही , कोणा कोणास भेटीने आपल्या
मग न भेटता ते कसे टळेल, हे तरी समजाव मला जरा
मुळीच नाही हट्ट भेटण्याचा, कि पण नाही केला न भेटण्याचा
बघू तरी किती दिवस हे स्पंदन दोन जीवांचे वेगळे धडधडते
हा भेटीचा हट्ट नाही गडे, ओढ म्हणून भेटावेसे वाटते,
कोण म्हणतो, मेल्यावरती ओढ भेटीची थांबते.....
थेंब थेंब होवून पाऊस, पुन्हा पुन्हा ते भेटू पाहते
पहिल्या पावसाच्या सुगंधात ते दरवळू पाहते
महेश उकिडवे