होईन का कधी मी तुझा ....
धुंध त्या क्षणी भेटलो आपण जेन्ह्वा
वाहिलीस तू गात्र गात्रतून जेन्ह्वा
वेनीतला मोगरा सांडला जेन्ह्वा
मी तुझा , तू माझी झालीस तेन्ह्वा
बहरले तुझे श्वास, आसमंती जेन्ह्वा
धुंध मी जाहलो तव लोचनी जेन्ह्वा
गंध माझा माळूनी नाहालीस जेन्ह्वा
मी तुझा , तू माझी झालीस तेन्ह्वा
शिरुनी बाहुपाशात मोकळी झालीस जेन्ह्वा
आलिंगुनी मला प्रीती दंश केलास जेन्ह्वा
अशी हरून स्वतःला जिंकलीस जेन्ह्वा
मी तुझा , तू माझी झालीस तेन्ह्वा
गंधित होत बहरली प्रीत आपली जेन्ह्वा
मोहित झाले चांदण्या आणि तारे जेन्ह्वा
लांबली रात्र मिठीत आपुल्या जेन्ह्वा
मी तुझा , तू माझी झालीस तेन्ह्वा
आळस देवून उठलीस सकाळी जेन्ह्वा
गुलाबी पहाट अंगणात नाहिली जेन्ह्वा
पारिजातक तो मोहून सांडला होता जेन्ह्वा
मी तुझा , तू माझी झालीस तेन्ह्वा
विचारात होतीस तू प्रत्येकास जेन्ह्वा
होतात का कधी स्वप्ने पहाटेची खरी
होईन का कधी मी तुझा ....
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment