रांगोळी
रंगारी तू माझा , सावळा रंगारी
रंग तुझा लेवून सजले मी अंतरी
रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी
मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास
उरलाच कोठे माझा साज, तुझ्यातूनच होतो माझा भास
रंगात तुझ्या अशीच मला रंगूदे , शेवटी तुझ्या पायरीवर सजुदे
कोंदण तुझ्या भोवती माझे असुदे , माझ्यात तुझे रंग सदा मिसळूदे
जोडी तुझी माझी अशीच असुदे , तू माझा भगवंत मी , तुझी रांगोळी असुदे ..
एक थेम्ब तुझ्यासाठी
५ ऑगस्ट २०२१