Sunday, August 28, 2016

बरसून जाईल कधीतरी .......


दूरदूर माझ्यापासून तू  काय मिळविलेस जाऊन
तुझ्या डोळ्यात रात्रभर वस्तीला असतोच की मी ,

आपल्यातील वाढवून अंतर काय साधलेस तू
तुझ्या श्वासात हरएक क्षण असतोच कि मी ,

वळवून कूस ,हसून खोटे, पुसून डोळे पुन्हा पुन्हा
जाळून आत्मा लागली का कधी शांत झोप कुणा

सये येईलच आठवण माझी, कधीतरी , कुठेतरी ,
मग दाटले प्रेमाचे आभाळ, बरसून जाईल कधीतरी

बरसून जाईल कधीतरी .......

एक थेंब तुझ्यासाठी
28 August 2016

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...