वखवखलेले डोळे , आसुसलेल्या जिभा
हाव काही सुटेना, फाटून गेला जरी खिसा
ओता पाणी कितीही तहान काही भागेना
ओरपण्याची सवय काही केल्या जाईना
डिसकाउंट हवे ह्यांना, कुपन हवे सर्वदा
भूक ह्यांची भागणार कधी हेच समजेना
ओढाओढी, रेटारेटी लांबचलांब रांगा सुरु
ह्या भुकेल्या भसमासुरांची पोटे कशी भरू
पाहून हे सारे खिन्नता मनी डोकावु लागे
थिजून गेले मन माझे,सुन्न झाले डोके,
हर एक हपापलेल्या राक्षसांची कहाणी वेग वेगळी
दारी असूनही समृद्धता, समाधानी रिकामी झोळी
वाटेल तुम्हाला काय हे चालू आहे काय मी बोलू
सांगतो तुम्हाला , पटणार नाही तरीहि
थ्यांक्स गिव्हिंग सुरु आहे …. एक शब्द नका बोलू
एक थेंब तुझ्यासाठी