कबरीतल्या निजलेल्या मूर्तीला, कुर्निसात मी करून गेलो
नकळत चुंबिता शब्दांना , माझे मी पण हरवून गेलो …
टेकवूनी माझे ओठ नावावरती तुझ्या ….
अमृतप्राशन मी करून गेलो…
अंतरीतल्या आत्म्याला सुगंधी करून गेलो.
एक थेंब तुझ्यासाठी
ज्ञानोबाच्या, ना तुक्याच्या वंशाचा मी, ना गदिमा, बोरकर, खानोलकर, कुसुमाग्रजांच्या जातीतला मी, ना मी पुलं, शन्ना, वपू च्या पंथातला मी, ना मी गुरु, संदीप च्या जात्कुळातील मी, मग मी कोण? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करणार आहे. सदर ब्लॉग हा, कॅपिटल मार्केट, आर्थ-शास्त्र , मानवी संबंध ह्याला समर्पित असेल.
रांगोळी रंगारी तू माझा , सावळा रंगारी रंग तुझा लेवून सजले मी अंतरी रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...