आलीस नाहून चांदण्यात
मोहरून गेलीस क्षणात
ओले रेशमी ते कुंतल
झालीस मोकळी झटकून ,
हलकेच पडले थेंब काही
विचारलेस का तरी कधी
त्या प्राजक्ताला,मोगर्याला ,
बहरलेल्या गुलाबाला,
टिपताना ते दवबिंदू
कशी नी काय होते घालमेल???
मी म्हणतो करतेस कशास हे वेडे चाळे ,
नसे ठावूक तुला
एकेका दव बिन्दुतुनी मग कसे फुलतात निखारे
दाटलेल्या हिरव्या रानात
वणवा का असाच पेटतो
बोल मात्र जळणाऱ्या
त्या प्रभाकरास बसतो
एक थेंब तुझ्यासाठी