चालताना जशी पाऊलवाट अलगद नागमोडी वळली
एक एक कहाणी दोघांमधली तितकीच अलगद फुलली
आजही आहेत नागमोड्या वाटेवरती त्या खाणा खुणा
शोधताना त्या अनामिक हूर हूर मनी आशीच दाटली
काय म्हणून सांगू त्या खाणा खुणा ....
तो नाजूक स्पर्शाचा प्राजक्त ,
कधी तो बहकलेला मोगरा,
कधी तो नखरेल हिरवा चाफा,
तर कधी ती हळुवार जाई ची फुंकर,
तर कधी त्या अल्लड जुई ची साद,
तर कधी झालेला गुलाब आरक्त,
तर कधी माळलेली अबोली,
काही कधी ती रुसलेली सायली..
गेलास तू निघून आणि ...........................
आठवणींची ओंजळ माझी नकळत तिथेच सांडली
सरताना संध्याकाळ...
आजही त्याच वाटेवरती ,आशीच एक कहाणी मी पहिली
लाजलेल्या सायलीला , चाफ्याने घातलेली गळ मी पहिली
हळुवार फुलणारी , नागमोड्या वळणाने जाणारी
ती पाऊलवाट मी पहिली......
एक थेंब तुझ्यासाठी