Saturday, February 4, 2012

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

बिछान्यावरचे ते मोकळे कुंतल पाहून..
पहाटेच्या प्राजक्ताने मनमोकळे बहरावे..
कधी तंग काचोळी मधले यौवन पाहून
सांजेच्या मोगर्याने मदना सारखे फुलावे
माळून गजरा अशा फुलांचा, धरता मी हात तुझा

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

सावरताना तव मोकळे कुंतल मज भान हरपावे
सोसाट्याच्या वार्याला ही मम श्वासांनी लाजवावे
वेणीतुनी ओघळलेल्या फुलांना तनु गंधाने मोहरावे
कंचुकीच्या गाठीला तेवढे स्मरण वेळेचे का रहावे ?

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे

गुंतलेल्या अधरानां कोणी आणि कसे सोडवावे ?
गुंफलेल्या श्वासांना का म्हणून मोकळे करावे ?
मिसळलेल्या देहांना का कोणी वेगळे करावे ?
भान कुठले त्या रात्रीला मग कशाचे राहावे ?

पाहता हे सारे चंद्र ढगा आडून पुन्हा पुन्हा पळतो ...
होवून सूर्य हाच तो सकाळ पासून दिवस भर जळतो ????

एक थेंब तुझ्यासाठी .....
०४/०२/२०१२




रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...