Thursday, January 12, 2012

सांगा मी कोणाची....

सांगा मी कोणाची....

लोचनांना माझ्या फुलावी रंग तुझा काळा, 

अधरांना माझ्या खुलवी रंग त्याचा निराळा.

नेहमीच तो येतो......

घाईत जातो पुसुनी रंग अधरांचा पुन्हा पुन्हा,

थांबतोस मात्र तू 

संगे अश्रूंच्या नेत्रात माझ्या पुन्हा पुन्हा ...

रंग गुलाबी त्याचा करतो मादक मम अधरांना

रंग काळा तुझा करतो बोलका मम लोचनांना ..

बेहोष होतो मग तो 

जवळ येण्यास मिळतो बहाणा त्याला पुन्हा पुन्हा 

लपतोस मात्र तू 

जाणून भावना मनीच्या येतोस दाटून पुन्हा पुन्हा

रंगात त्याच्या मी मिसळून जाते सदा न कदा

तरी तो जातो उडून पुन्हा पुन्हा ..
.
रंगात मात्र तुझ्या मी हरवते पुन्हा पुन्हा

तू लुप्त होतोस माझ्यात पुन्हा पुन्हा ...

सांगा मला मी कोणाची ?

ओठांवर रंगणाऱ्या गुलाबी रंगांची

की डोळ्यातल्या काळ्या काजळाची ..
.
सांगा ना मी कोणाची.... मी कोणाची

एक थेंब तुझ्यासाठी

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...