तुझा तो पहिला स्पर्श , माझ्या अंगावरचा तो काटा,
तेन्ह्वा जशी लकाकली वीज, आणि तो पाऊस पडलेला
पुन्हा तसा कधी पडलाच नाही................................
दूर देशी गेला साजण माझा , आता कुठलाही पाऊस मला भिजवत नाही
तेन्ह्वा जे केलेस मला तू धुंध, गंध तो अजून वाहते मी
तेन्ह्वा जो मजला मिळाला रंग , अजूनही तशीच रंगते मी
पुन्हा कधी असा सडा रंगांचा पडलाच नाही..................................
दूर देशी गेला साजण माझा, आता कुठल्याच इंद्रधनुत रंग मजला दिसत नाही.
अशी भिडले मी तुला नागीणे सारखी , रोखून धरलास तू श्वास
केला मी दंश असा तुझ्या ओठी , केलेस तू मोकळे श्वास
पुन्हा असा दंश कधी कोणा केलाच नाही......................
दूर देशी गेला साजण माझा, आता या नागीणेला कोणी डोलावतच नाही..
सांग मला पुन्हा येशील कधी परतून तू
अंगणातला तो पाऊस , तो केवड्याचा गंध, तो ओथंबलेला श्वास
या नागीणीला आता रहावत नाही .....
वाजते बिन आताशा जरी, तरी ती वेळूची साद कोणी घालीत नाही
दंशासाठी तडफडणाऱ्या नागिणीची व्यथा कोणा कळतच नाही .....
महेश उकिडवे