Thursday, August 5, 2021

रांगोळी ...

 




रांगोळी 



रंगारी तू माझा , सावळा रंगारी 

रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी  

रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी 

मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास 

उरलाच कोठे माझा साज, तुझ्यातूनच होतो माझा भास 

रंगात तुझ्या अशीच मला रंगूदे , शेवटी तुझ्या पायरीवर सजुदे 

कोंदण तुझ्या भोवती माझे असुदे , माझ्यात तुझे रंग सदा मिसळूदे 

जोडी तुझी माझी अशीच असुदे , तू माझा भगवंत मी , तुझी रांगोळी असुदे .. 


एक थेम्ब तुझ्यासाठी 

५ ऑगस्ट २०२१

Saturday, November 28, 2020

काश ऐसा मंजर होता

 



काश ऐसा मंजर होता, मेरे काँधे पे तेरा सर होता 

प्यारसे खेलता मै तेरी जुल्फोंसे , 

सांसों का तेरे , दिलसे मेरे 

रिश्ता कोई अलग होता 


उलझता मै तेरी लट से बारहा  , खुश्बूसे तेरी टकराता 

महकती हुइ सांसोंसे  लिपटता 

बेहकता हुवा , यूँही बेह जाता 

काश ऐसा मंजर ,मेरा मुक्क्दर होता 


एक थेंब तुझ्यासाठी 

२८ Nov २०२० 

Thursday, November 26, 2020

कथा शेवटी तुझीच होती

 

कालची ती पौर्णिमा , आजची हि अमावस्या 

दोन्ही मंजूर होत्या मला 

कधी तुझ्या असण्याची, कधी नसण्याची 

चर्चा तुझीच होती , 


कधी गायली कहाणी, कधी छेडली विराणी, 

सुरात होत्या दोन्ही तुझ्या 

कधी झाले होते भक्त तुझे , कधी झाले दास होते 

मूर्ती तुझीच होती 



कधी झालो होतो तुझा, कधी तू माझी झाली होती 

कथा शेवटी  तुझीच होती 


एक थेंब  तुझ्यासाठी 

26 Nov 2020


Saturday, April 18, 2020

आदत थी

ना तुम्हे पानेकी चाहत , ना खोने की उम्मीद

न थे हम बेसब्र कभी , न बेसबब की बातथी

बस तुमसे इश्क़ था , उसीकी आदत थी 

Saturday, September 7, 2019

दवबिंदूंचा सडा अंगणात




पहाटे पहाटे , दवबिंदूंचा सडा अंगणात
मिठीत विरघळती , कामनेचे आकाश

ओठांवर उरले , अव्यक्त  ईशारे
लोचनात राहिले , स्वप्न अधुरे
स्वप्नांच्या नावेतून , लांबचा प्रवास

पहाटे पहाटे दवबिंदूंचा सडा अंगणात ...


एक थेंब तुझ्यासाठी
०७ सप्टेंबर २०१९

Friday, November 9, 2018

त्याची कविता एक अलंकार आहे ...




त्याची कविता एक अलंकार आहे ...

मनाचे तुझ्या दार आता कशाला बंद आहे?
प्रेम नाही म्हणतेस,हा तुझा अहंकार आहे..

काही न बोलता हि तूला वाटते शहाणी आहेसं,
न बोलणारा तुझा अबोला बघ किती बोलका आहे.

आता कशाला पाहतेस आरसा पुन्हा पुन्हा
मनात तुझ्या माझेच प्रतिबिंब उमटले आहे

तुझ्या लेखी प्रेम एक केलेला उपकार आहे
तिरस्कार हाच मम मिळालेला पुरस्कार आहे,

लिहू काय मी अजून तुझ्यावर आता ?
कविताच माझा प्रेम अलंकार आहे ....

एक थेंब तुझ्यासाठी ...

Sunday, September 2, 2018

ठाऊक नसते कोणा .....





ठाऊक नसते कोणा


भेटतो आपण कितीदा, उगाच बोलत बसतो
स्वप्न आणि रात्रीचा खेळ असाच चालू असतो

मी मात्र झोप येत नाही हा कांगावा करीत बसतो


उभा शिशिर अंगणात ,  निष्पर्ण वस्तीत रहातो 
न दिसे कोणी वळणावर , वाट कोणाची बघतो

स्वप्नांचा पडला पाचोळा , मी उगाच तुडवत बसतो


कोणती नक्षी त्या दगडावर , मातीला ओलावा असतो
उडून येते एक फुल कधी ,  मंद दिवा जळत असतो 

ठाऊक नसते कोणा , कबरीला पण सुगंध असतो


एक थेंब तुझ्यासाठी

०२ नोव्हेंबर २०१८

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...